7.2 C
London
Sunday, October 13, 2024
HomeUncategorizedअंड कुपोषित बालकांच्या वाढीत सुधारणा करते

अंड कुपोषित बालकांच्या वाढीत सुधारणा करते

Date:

Related stories

Trailblazing Women in Steel: Meet Nucor’s Industry Leaders

Get to know three women who are shaping the...

Meet Tricia Drake, Entrepreneurs Affinity Group Lead

As part of the Entrepreneurs AG's spotlight month, learn...

NetApp appoints Ganesan Arumugam as APAC Senior Director

NetApp has announced the appointment of Ganesan Arumugam as...

C3iHub, IIT Kanpur Launches Six-Month Residential Cyber Commando Training Program

In a significant step towards enhancing the nation’s cybersecurity...

अंड कुपोषित बालकांच्या वाढीत सुधारणा करते

अंड्यामुळे कुपोषित बालकांची चांगली वाढ होते आणि त्यामुळे गरीब समुदायांना उच्च दर्जाची प्रथिने मिळतात

सुरेश चित्तुरी : श्रीनिवासा फार्म्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्हाईस चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्ट तसेच इंटरनॅशनल एग कमिशन (आयईसी)चे व्हाईस चेअरमन

“अंडी आरोग्याच्या दृष्टीने चांगली मानली जातात, परंतु, बालकांच्या आहारातील हा एक महत्त्वाचा घटक ठरतो. आपल्या मुलाबाळांना चविष्ट आणि पोषक आहार उपलब्ध करून देण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. आपल्या बालकांमध्ये शिकण्यासाठी, त्यांच्या वाढीकरिता आणि यशासाठी उर्जा असावी हे प्रत्येकालाच वाटते. यामध्ये अंड्याची भूमिका मोठी आहे. प्रामुख्याने बालपणी उच्च दर्जाचे प्रथिन अत्यावश्यक असते. लहानग्यांच्या मेंदूची सुदृढ वाढ होण्यासाठी अंड्याच्या बलकातील चोलिन खूप महत्त्वाचे ठरते. त्यामुळे आकलन आणि स्मरणशक्तीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बालकांच्या मेंदूच्या भागांना चालना मिळते” असे सुरेश चित्तुरी : श्रीनिवासा फार्म्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्हाईस चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्ट तसेच इंटरनॅशनल एग कमिशन (आयईसी)चे व्हाईस चेअरमन म्हणाले.

अंडी हा एक परिपूर्ण अन्नघटक आहे, त्यात साखरेचे प्रमाण अजिबात नसते. तसेच तो जीवनसत्व आणि पोषक तत्त्वांनी समृद्ध असतो. अभ्यास दर्शवतो की, बालकाचे वजन नियंत्रित करण्यासाठी, तसेच ते कायम ठेवण्याकरिता अंडी मोलाची भूमिका बजावतात. (eggs can play to regulate and maintain a child’s weight) अंड्यासारख्या उच्च-प्रथिने असलेल्या अन्नघटकाचे सेवन केल्यास बालकांची 32% असणारी भूक 14% कमी होते. कर्बोदकांनी समृद्ध आहाराच्या तुलनेत खाण्याची इच्छा 30% खाली येते.3 बालकांमध्ये आरोग्यवर्धक वजन नियंत्रण यावे, म्हणून अंडी गुरुकिल्ली आहे!
अंडी हा लोहाचा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो व प्रथिने, जीवनसत्व अ, ड आणि ई तसेच ब12 व चोलीनचा पोषक स्त्रोत आहे. अंड्यांमुळे बालकांना भरपूर काही मिळते. हे त्यांच्या आहारातील प्रमुख अन्न ठरते, जे त्यांना सुदृढ, बळकट व स्मार्ट बनायला साह्य करते.
बालपणात होणाऱ्या कुपोषणाचा आरोग्य व जीवनाच्या दर्जावर दुष्परिणाम होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अनुसार लक्षावधी बालकांना उंची खुंटणे, पुरेशी वाढ न होणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. डब्ल्यूएचओ म्हणते, 159 दशलक्ष बालकांची वाढ होत नाही, 50 दशलक्ष मुले खुजी राहतात. बऱ्याचदा पोषक अन्नघटकांचा पुरेसा पुरवठा न मिळाल्याने कुपोषण होते, ज्यामुळे मायक्रोन्यूट्रियंट डिफीशीएन्सीसारख्या समस्या उदभवतात.
भारताच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये चारपैकी एक बालक कुपोषित आढळतो, जरी भारतात सर्वाधिक शहरीकरण झाले तरीही पाच वर्ष वयोगटाखालील 22.3 टक्के बालकांची पुरेशी वाढ झालेली नसेल, 21.4 टक्के बालकांचे वजन पुरेसे भरणार नाही आणि भारतासारख्या सर्वाधिक लोकसंख्या आढळणाऱ्या देशात 13.9 बालके खुज्या अवस्थेत असतील.
सरकारी शाळांमध्ये कुपोषणावर मात करण्यासाठी आम्ही इंटरनॅशनल एग कमिशन (आयईसी) मध्ये आम्ही श्रीनिवास फार्म्सच्या माध्यमातून 30 सरकारी शाळा दत्तक घेऊन त्यांना वर्षभराच्या कालावधीसाठी मध्यान्ह भोजनाचा भाग म्हणून पोषक अंडी पुरवत आहोत.
वाढ आणि विकासाच्या दृष्टीने अंडी अनेक पोषक आवश्यकतेसाठी किफायतशीर स्त्रोत आहे. तसेच एग फार्म्स ही जगभर ग्रामीण व गरीब समुदायाकरिता पर्यावरणावर कमी परिणाम करत उच्च-दर्जाचे प्रथिन पुरवणारा चांगला पर्याय ठरतात.

Subscribe

- Never miss a story with notifications

- Gain full access to our premium content

- Browse free from up to 5 devices at once

[tds_leads input_placeholder="Your email address" btn_horiz_align="content-horiz-center" pp_msg="SSd2ZSUyMHJlYWQlMjBhbmQlMjBhY2NlcHQlMjB0aGUlMjAlM0NhJTIwaHJlZiUzRCUyMiUyMyUyMiUzRVByaXZhY3klMjBQb2xpY3klM0MlMkZhJTNFLg==" pp_checkbox="yes" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLXRvcCI6IjMwIiwibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjQwIiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tdG9wIjoiMTUiLCJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMjUiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3NjgsImxhbmRzY2FwZSI6eyJtYXJnaW4tdG9wIjoiMjAiLCJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sImxhbmRzY2FwZV9tYXhfd2lkdGgiOjExNDAsImxhbmRzY2FwZV9taW5fd2lkdGgiOjEwMTksInBob25lIjp7Im1hcmdpbi10b3AiOiIyMCIsImRpc3BsYXkiOiIifSwicGhvbmVfbWF4X3dpZHRoIjo3Njd9" display="column" gap="eyJhbGwiOiIyMCIsInBvcnRyYWl0IjoiMTAiLCJsYW5kc2NhcGUiOiIxNSJ9" f_msg_font_family="downtown-sans-serif-font_global" f_input_font_family="downtown-sans-serif-font_global" f_btn_font_family="downtown-sans-serif-font_global" f_pp_font_family="downtown-serif-font_global" f_pp_font_size="eyJhbGwiOiIxNSIsInBvcnRyYWl0IjoiMTEifQ==" f_btn_font_weight="700" f_btn_font_size="eyJhbGwiOiIxMyIsInBvcnRyYWl0IjoiMTEifQ==" f_btn_font_transform="uppercase" btn_text="Unlock All" btn_bg="#000000" btn_padd="eyJhbGwiOiIxOCIsImxhbmRzY2FwZSI6IjE0IiwicG9ydHJhaXQiOiIxNCJ9" input_padd="eyJhbGwiOiIxNSIsImxhbmRzY2FwZSI6IjEyIiwicG9ydHJhaXQiOiIxMCJ9" pp_check_color_a="#000000" f_pp_font_weight="600" pp_check_square="#000000" msg_composer="" pp_check_color="rgba(0,0,0,0.56)" msg_succ_radius="0" msg_err_radius="0" input_border="1" f_unsub_font_family="downtown-sans-serif-font_global" f_msg_font_size="eyJhbGwiOiIxMyIsInBvcnRyYWl0IjoiMTIifQ==" f_input_font_size="eyJhbGwiOiIxNCIsInBvcnRyYWl0IjoiMTIifQ==" f_input_font_weight="500" f_msg_font_weight="500" f_unsub_font_weight="500"]

Latest stories